चला बांधूया परवडणारं घर

देशातील एकूण गुंतवणूकीच्या साठ टक्के गुंतवणूक बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध घटकांमध्ये होते, तरीही आपल्याला प्रत्येकाला हक्काचा निवारा देता आलेला नाही. प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्नाच्या तीन ते सहा पटीच्या रकमेत घट द्यायला हवी. आपल्याकडे हे प्रमाण दहा ते वीस पात इतके गेले. माणसांची हयात घराची कर्जे फेडण्यात जाते आहे. त्यामुळे घर परवडणारे हवे, ते कसे देता येईल यासाठी खूप मोठया संशोधनाला-व्यवसायाला वाव आहे.मध्यवर्गीय गरीब घटकासाठी अशी घरे देण्यासाठी शासन विचार करते. मात्र ते ठराविक चौकटीत.त्यासाठीचा मुलभूत विचार मात्र नाही. साधारण खर्चाच्या ऐशी टक्के बांधकाम साहित्यावर आणि २० टक्के बांधकाम मजुरीवर खर्च व्हायला हवा.लक्झरीयस घरांचा हा खर्च पन्नास-पन्नास टक्के इतका गेला आहे. आपण बचत करू ती ८० टक्के बांधकाम साहित्याबाबत तंत्र कोणते, यावर परवडणारे घर अवलंबून आहे. जागांचे वाढते दर हा विषय खेडयांमध्येही आता गंभीर होत आहे. तरीही शहराईतकी भयावहता नाही.परिसरात उपलब्ध रोजगाराच्या संधीशी जागेच्या दराचा संबंध आहे.त्यामुळे ती बाबही व्यक्तीच्या हातात नाही शासन धोरणांचा प्रभावही घरांच्या खर्चावर पडत असतो. मात्र अशा अनेक बाबींचा स्वतंत्रपणे विचार करून परवडणारी घरे देणारे धोरण सतत अपडेट करता येणे शक्य आहे.

गेल्या पन्नास वर्षात आरसीसी म्हणजे भक्कम, अशी तंत्रज्ञानावरची पक्की अंधश्रद्धा भारतीय समाजात रूढ झाली आहे. लोड बेअरिंग (समतोल भर वाहणाऱ्या भिंतीची बांधकाम पद्धती) बांधकाम पद्धतीच्या तीन तीन माजली इमारती आजही आपल्याकडे अस्तित्वाचा आहे. आता त्यात नव्या तंत्रज्ञानाचा विचार करून सव्वा फूट ते नऊ इंचाच्या भिंतीचा वापर करून दोन माजली घरे सहज शक्य आहे. केवळ आरसीसी ला फाटा देऊन लोड बेअरिंग पद्धत जर स्वीकारली तर बांधकाम साहित्याच्या खर्चात पंधरा ते वीस टक्के बचत शक्य आहे. आजघडीला एक हजार चौरस फुटाच्या बांधकामात सुमारे २ लाखांचा स्टील (सळई) खर्च आहे.त्याचबरोबर येणारा कॉंक्रिटचा खर्च वेगळा आहे. त्यामुळे या दोन गोष्टी अनावश्यक ठिकाणी जरी टाळल्या तर परवडणाऱ्या घरासाठी खूप मोठी पाऊल पडेल.

चांगल्या दर्जेदार विटांचा अभाव ही आपल्याकडे खूप मोठी समस्या आहेत दुर्दैवाने विट उदयोग स्थानिक आणि विकेंद्रित असल्याने विट कमीत कमी खर्चात मिळवण्यासाठी आवश्यक घासाघीस सहज शक्य होते. स्पर्धेमुळे विटेच्या दर्जाबाबत तडजोड करून विट पुरवण्याकडे सर्वांचा काळ राहिला आहे. विटेचे हे दुवळेपण झाकण्यासाठी सरसकट भिंतीना गिलावा केला जातो. चांगल्या मजबूत विटा हव्यात आणि त्यांची पाणी धारण करण्याची क्षमता कमीत कमी हवी. त्यानंतर आपल्याला भिंती गिलाव्याशिवायही ठेवता येतील. ज्यामुळे वाळू,गिलावा मजुरीचा येईल.आजही शेकडो अशा जुन्या इमारती आहेत की केवळ दोन विटांमधील फटीत सिमेंट, चुना भरून आणि विटांचा बाह्यभाग खुला ठेवलेल्या दिसतील.घराच्या केवळ बाह्य भागाचे प्लास्टरिंग (गिलावा) टाळले तर शंभर चौरस फूट (ब्रास) अडीच ते चार हजार इतका खर्च सहज कमी करता येईल.

आरसीसी घराच्या बांधकामातही अनेक छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या तर खर्चाला आळा घालता येणे शक्य आहे.त्यातला पहिला भाग म्हणजे खोल्यांमध्ये साहित्य ठेवण्यासाठी काढली जाणारी Loft टाळणे. साधारण एका खोलीतील Loft च्या खर्चातून त्या खोलीच्या चार इंची दोन भिंतीचे बांधकाम होऊ शकते. कारण Loft साठीचा जादाचे स्टील, कॉंक्रिट, गिलावा, मजुरी असा खर्च येतो. Loft ऐवजी कडाप्पा, फरशीची कपाटे केली तर खर्च कमी येऊन उपयोगही चांगला होतो. याच प्रमाणे खिडक्यांसाठी आरसीसी छज्जे टाळून ते विटा-कौलांमध्ये करता येतील.

दारे-खिडक्या हा घरातील आणखी एक खर्चिक भाग. यात खूप मोठया संशोधनाला वाव आहे.दरवाजाचा पन्नास टक्के खर्च हा त्याचा चौकटीला जातो.अनेक जुन्या वाडयांची दारे विनाचौकात आढळतात. खुंटीचे (Pivot) दरवाजे तयार करणारे तंत्र चांगल्या पद्धतीने विकसित करता येईल. हेच खिडक्यांबाबत. आजकाल स्लायडिंगच्या खिडक्यांमुळे एकूण क्षेत्राच्या फक्त पन्नास टक्केच खिडक्या उघडल्या जातात जागेच्या कमतरतेवर मात म्हणून अशा खिडक्या आल्या. दोन्ही गोष्टी साधल्या जातील अशी लोखंडी द्वारे फोल्डिंगच्या (Louvered) खिडक्या तयार करता येण शक्य आहेत. अशा खिडक्यामध्ये दरांचा,संरक्षक सळाइचा खर्च वाचवता येईल. या खिडक्यांमुळे घरामाध्ये येणारी आंतरिक्त उष्णता टाळली जाईल.याचाच भाग म्हणून आवश्यकतेनुसार विटांमध्येच जाळीदार खिडक्या केल्या तर आणखी बचत आणि उपयुक्तता वाढेल.

आर्च, डोमचा कॉंक्रिट Slab ला (छताला), लिंटलला (छावणी) पर्याय देता येणे शक्य आहे.पूर्वीपासून अशी छत रचना अस्तित्वात आहे. पिलर, Slab मुळे सळई सिमेंटच्या जादाच्या खर्चालाही आळा घालत येणे शक्य आहे. प्रती शंभर चौरस फुटाच्या आर.सी.सी. Slab च्या छताच्या तुलनेत या पद्धतीचा वापर केल्यास पंधरा ते वीस टक्के बचत शक्य आहे.

फरशीला टाळण्यासाठी कोबा सर्वोत्तम पर्याय आहे. चांगला दर्जाचा रंगाचा वापर करून विविध छटामधे कोबा केला जाऊ शकतो. शहाबादी किंवा कडाप्पा फाराशांचाही सौंदर्यपूरक वापर शक्य आहे.तुलनेने खर्चही हि कमी होतो.

कॉंक्रिटचा अचूक दर्जा मिळवण्यासाठी सिमेंट आणि पाणी यांचे योग्य प्रमाण हवे.स्लोपिंग रुफ (उताराचे छत) साठी कॉंक्रिट घट्टकरावे लागते. आर.सी.सी.मध्ये असे उताराचे छत केल्याने ती बहुतेक ठिकाणी गळतात. त्यामुळे बऱ्याच अशा छतावर पुन्हा कौले बसवली जातात. त्याऐवजी कौलाचेच छत केले तर खर्च कमी आणि उपयुक्तता व इमारतीचे सौंदर्यही वाढते.

घरातील जिने आर.सी.सी.मध्ये घेण्याऐवजी लोखंड व लाकडाचा वापर करून केल्यास दहा फुट उंचीच्या जिन्याचा खर्च पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी करता येईल.जीना आर.सी.सी. मध्ये केल्यानंतरही पुन्हा फरशी लावा.फोल्डिंगचा खर्च करावा लागतो तो टळेल.

घरात आकाशातून थेट प्रकाश (स्काय लाईट) घेतला तर तो आपल्याला दिवसभर उपयोगी पडेल. खिडक्यांच्या तुलनेत त्यांचा खर्च हि कमी येईल. शिवाय आपल्याकडे असणारा धुळीचा त्रास टाळता येईल. स्काय लाईटसाठी, जुन्या बाटल्यांचा छतात तसेच भिंतीतही खूप चांगला ,स्वस्तात उपयोग शक्य आहे.

पावसाचे पाणी थेट भिंतीवर येणार नाही, अशी छत रचना केली तर गिलाव्याची गरज उरत नाही. कोकणात अशी घरे दिसतात.

जुन्या खिडक्या, दरवाजे, लाकूड, दगडांचा वापर केल्यास घराचा, बांधकाम साहित्याचा बचत होते.

मानवी उंचीची प्रमाणबद्धता लक्षात घेऊन घरे बांधायला हवीत. आज उंच छताचा सोस वाढल्याने घराचा खातच हि वादाला आहे.

गरजेइतकेच घर बांधले जावे, अन्यथा त्याचा देखभालीचा खर्च आयुष्यभरासाठी माग लागतो. पूर्वी एक राजा होता. एकच राजवाडा असायचा. आता प्रत्येकला राजवाडाच हवाय. पृथ्वी मात्र एकाच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.