गरज आरोग्यदायी वास्तुची !

अन्न,वस्त्र आणि निवारा या मानवी मुलभूत गरजांमधील निवाऱ्याभोवती असतो. बांधकाम क्षेत्रात जगाचे साठ टक्के अर्थकारण सामावलेय. याचा त्या आकडयांचा तपशील काळानुरूप कमी जास्त होईल. मग बांधकाम क्षेत्र जगाच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहे आणि ते प्रसरणासमोर काही मोठे प्रश्न उभे करतेय. विकासाची व्याख्या या क्षेत्राभोवती गुंफलेली असते. घर,निवारा प्रत्येकाची निकडीची गरज. किंबहुना आज अन्न-वस्त्र या पहिल्या दोन मुलभूत गरजा जगाने बऱ्याच अंशी सोडवल्या आहेत; मात्र ‘हक्काचा निवारा’ ही समस्या आज सर्वच विकसनशील देशासमोरची मोठी समस्या आहे.भारतासमोरचे घर हेच वास्तव आहे छोटेसे का असेना, घर आसवे! हे प्रत्येकाचे स्वप्न असते. शहरे झपाटयाने बदलतात म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा, वास्तू बदलतात. मोठमोठया इमारतींनी परिसर व्याप्त असताना, त्यात आधुनिक साधनसुविधा येत असतानाही घर मन हरवतेय,अशी रुख रुख लागून राहते. घर आपल्या भौतिक गरजा पूर्ण करते आणि त्याचा अंगाने विचार करता ते आपल्या जगण्यात आज ताण निर्माण करते.या ताणाचे दुष्परिणाम बिघडलेल्या आरोग्यातून दिसुन येतात.त्यामुळे आजची घरे आरोग्यदायी आहेत का? हा कळीचा प्रश्न आहे. आणि दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे.उलट या आधुनिक जीवनशैलीच्या आग्रहातून तयार होणारी घरे आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण देणारी ठरत आहेत. त्यामुळे आपले घर आपल्याला परवडणारे हवे. त्याचे डिझाईन आकर्षक हवे. मुलभूत गरजांची पूर्तता करणारे हवे. अशा त्यांचा अपेक्षांच्या मुळाशी ‘आपले घर आरोग्यदायी हवे’ हि सर्वाधिक महत्वाची व प्राधान्याची अपेक्षा असायला हवी.

आधुनिक जीवनशैलीचे प्रतिक असणारी आजची कॉंक्रिटी घरे खेडोपाडयांचाही चेहरा बदलत आहेत.पॉलिशफारशा,गुळगुळीत भिंती,भडक रंग-प्रकाश व्यवस्था असलेली ही घरे चकाचक दिसत असली तरी खातेच आरोग्यदायी आहेत का?…… डोंगरदऱ्यांमधले घर आणि पठारी भागातील घर, एकाच डिझाईनचे कसे आसू शकते? परिसरातील पाऊसमान,हवामानाचा विचार घर बांधताना केला आहे का?….. अशा छोटया छोटया गोष्टीचा मोठा विचार व्हायला हवा.असा विचार न झाल्याने अनेक विचारांची देणगी आपसूकच मिळतेय. आजकाल सांदेदुखीचा त्रास,लहान वयात चष्मा, निंद्रानाश अशा विकारांच्या मुळाशी आधुनिक घर ही आहे. त्यासाठी आपल्या परंपरागत घर बांधकाम पद्धतीतील जे काही चांगले आहे ते सोबत घेता आले पाहिजे .त्याच वेळी त्या मागचे विज्ञान समजून न घेता केवळ वास्तुशास्त्राच्या रूपाने सुरु असलेले अंधानुकरणही उपयोगाचे नाही. त्यातून समस्या तर सुधरणार नाहीतच, उलट आणखी आर्थिक नुकसानच वाटयाला येतेय. वास्तुशास्त्राचे माजलेले घोतांड ‘रोग रेडयाला आणि उपचार पायाखाली’ या म्हणीप्रमाणे आहे.माणूस अस्वस्थ आहे आणि त्याची कारणे घराच्या रचनेत शोधली जात आहेत. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी खर्च होणारे उमेदीचे आयुष्य आपण पाहतो आहोत. हे आयुष्य आनंदाचे करणारे घर असेल, आपल्या गरजेनुरूप, ऐपतीचे घर कसे असेल,या आणि अशा अनेक सहज पडणाऱ्या प्रश्नांचा हा धांडोळा………

Leave a Comment

Your email address will not be published.