डिजिटल इको होम म्हणजे काय?

गृह निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेला व आपल्या स्वप्नातली स्वत:ची “वास्तु” साकारणाऱ्या ह्या व्यसपीठबद्दल थोडक्यात जाणून घ्या

leaf-free-img

स्वप्न प्रत्येकान पाहवं…

स्वप्न पाहण, सर्वांना सोबत घेण आणि सर्वांनी मिळून उत्साहात ही स्वप्न पूर्ण करण या प्रमुख विचारधारेमुळे आमचा  इथपर्यंतचा प्रवास खूप आनंददायी ठरला.

मुळात, स्वप्न पाहिल्याशिवाय ते सत्त्यात उतरत नाही आणि घराच स्वप्न तर सगळ्यात अवघड स्वप्न. आयुष्यभर या स्वप्नाचा पाठपुरावा करून हट्टाने हे स्वप्न सत्त्यात आणणारी माणसं घरोघरी सापडतात. कारण स्वप्नपूर्तीच्या घाई-गडबडीत ते सत्य विसरतात. तुम्हीही जर घर शोधात असाल, बांधत असाल, घराचा विचार करत असाल, घराचं स्वप्न पाहत असाल, तर एक गोष्ट कधीही विसरू नका.

”घर” जरी स्वप्न असलं तरी ते जमिनीवरच असाव लागत, जमिनीत घट्ट रुजाव लागत, ते दगड-विटांच असत, ते माणसांनीच घडवाव लागत. घर हे स्वप्न असेल किंवा नसेलही, पण घर हा निश्चीतपणे व्यवहार असतो. या व्यवहाराला भौतिक, तांत्रिक, व्यावहारिक, कायदेशीर, रासायनिक, कौटुंबिक, सांस्कृतिक असे अनेक पैलू असतात. यापैकी एकाही बाबीकडे जर दुर्लक्ष झालं, तर आपल्या स्वप्नातलं घर आपल्याला स्वप्नपुर्तीचा आनंद न देता, आयुष्यभर आपल्या उरातल सल बनून राहत.

खुपदा हे स्वप्न आपण आयुष्यात एकदाच सत्यात उतरवू शकतो. तेव्हा, जमलं तर घर बांधण्याआधी, शोधण्याआधी, विकत घेण्याआधी त्याबाबत पूर्ण विचार करा. आमच्याशी मनमोकळेपणाने खुप विचारा, खूप बोला…

leaf-free-img

घराचंं स्वप्न…स्वप्नातलं घर…

माणूस लहान असो वा मोठा, श्रीमंत असो वा गरीब, सुशिक्षित असो वा अशिक्षित प्रत्येकाच्या मनात एक घर असत. अगदी लहानपणापासून, समजायला लागल्यापासून तो घर बंधू लागतो-पत्त्याच, वाळूच, शिंपल्याच, काड्यांच…आयुष्यात एकदाही भातुकली, घर…घर न खेळलेल मूलं सार जग शोधलं तरी सापडणार नाही.

प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असत. प्रत्येकाच्या स्वप्नात एक घर असत. झोपडीत राहणाऱ्याला बंगला बांधायचा असतो. 

प्रत्येकाच स्वप्न त्याचं स्वतःच असतं…

leaf-free-img

सुंदर घरांचा, स्मार्ट परिसर व करू पर्यावरण रक्षण

आम्ही तुमच्या कल्पनेतील घर फक्त साकारणार नाही तर त्यात मायेचा, आपुलकीचा ओलावाही निर्माण करणार चला तर, ” वास्तुश्री परीवाराने ” सुरु केलेल्या “डिजीटल इको होम” या पर्यावरणपूरक वास्तू व रोजगारनिर्मितीच्या मोहिमेला आपण सर्वांनी हातभार लावला तर आपली भावी पिढी आपला अपमान न करता पुरस्काराच करेल. निसर्गाला डिचवून वा दुर्लक्षुण नव्हे तर पर्यावरणाला अनुसरूनच आपण आपल्या भावी पिढीला नैसर्गिक जगण शिकवूया.आपला कष्टाचा पैसा आमच्या अत्याधुनिक व अत्यल्प दरातील वास्तुरचनेतुन वास्तु साकारून मार्गी लावूया.

चला तर, आजच सहभाग नोंदवुया आमच्या “आपली माती, आपल्या माणसांसाठीचा” पर्यावरणपूरक अशा अभिनव संकल्पनेत व साकारू “सुंदर घरांचा,स्मार्ट परिसर व करू पर्यावरण रक्षण “…