आमच्या विषयी

गृह निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेला व आपल्या स्वप्नातली स्वत:ची “वास्तु” साकारणाऱ्या ह्या व्यसपीठबद्दल थोडक्यात जाणून घ्या

आमच्या बद्दल

आज आपल्या माणसांशी हितगुज करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमचा परिवार म्हणजे बांधकाम, औद्योगिक, मिडिया व मार्केटिंग क्षेत्रातली आज झपाटयाने वाढणारी कंपनी म्हणुन उदयाला येत आहे. गृह निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असलेला व आपल्या स्वप्नातली स्वत:ची “वास्तु” साकारणाऱ्या ग्राहकांना एकत्र आणणारं व त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच छताखाली साकारणार एक सर्वांगसुंदर असे व्यासपीठ आहे.

मागील ५ वर्षापासुन आमच्या बांधकाम, औद्योगिक, मिडिया व मार्केटिंग क्षेत्रातील विस्तारामुळे आमची ग्राहक सेवेशी नाळ जोडलेली आहे. आमच्या सर्व परिवाराला स्पष्ट जाणीव आहे की, “घर” साकारणारा किंवा खरेदी करणारा आपले आयुष्यातील महत्त्वाचे स्वप्न व कष्टाचा पैसा आमच्या स्वाधिन करत असतात. म्हणुनच, त्याचा पैशाचा पुरेपुर मोबदला व मनातील घराची रचना त्याचा पदरी पडावी हाच आमचा सदैव प्रयत्न असतो. मोठी स्वप्न पाहण, सर्वांना सोबत घेण आणि सर्वांनी मिळून उत्साहात ही स्वप्न पूर्ण करण या प्रमुख विचारधारेमुळे आमच्या पर्यावरणपुरक नाविन्याचा वारसा असलेल्या अनेक संकल्पना आम्ही साकारल्या. आपल्या विश्वासाच्या बळावर आजमितीस सर्व क्षेत्रात ५००० हुन अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या पुर्ण करून डिझाईन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्याचा आम्हाला व आमच्या सर्व सहकाऱ्यांना सार्थ अभिमान आहे.

आपल्या कामाप्रती मनापासूनची आवड, कामात गतिशीलता, काटेकोर निरिक्षण व कामाचा उत्तम दर्जा हि माझ्या मते आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आमची प्रत्येक संकल्पना म्हणजे बारकाईने नियोजन, काटेकोर तपशील, नाविन्यता कलात्मकता, उपयुक्तता व ग्राहकाचे समाधान यांचा मिलाफ असतो. कारण, आम्ही निर्माण करतो “नातं जिव्हाळ्याचं, आपल्या माणसाचं” आपल्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही भविष्यात देखील आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करू व नवनवीन यशो शिखरे पादाक्रांत करू याबद्दल मनात बिलकुल संदैह नाही…!